Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Navneet Rana : पुरुष मतदार २ वाजेपर्यंत पार्ट्या करतील, महिला मतदार इमानदार; नवनीत राणांचं विधान चर्चेत

Navneet Rana : पुरुष मतदार २ वाजेपर्यंत पार्ट्या करतील, महिला मतदार इमानदार; नवनीत राणांचं विधान चर्चेत

Navneet Rana : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले वक्तव्य केले आहे. पुरुष मतदारांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “पुरुष मतदार रात्री २-३ वाजेपर्यंत वेगवेगळ्या पक्षांच्या पार्ट्या करत फिरतात, तर महिला मतदार मात्र इमानदार आणि एकनिष्ठ असतात.

बायका कुणाच्या पैशाला आणि पार्ट्यांना बळी पडत नाहीत. त्या चटणी-भाकरी खाऊनही घर सांभाळतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठावान राहतात.” या वक्तव्यामुळे पुरुष मतदारांना ‘बेइमान’ ठरवल्याची टीका होत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’ पुन्हा मैदानात

विधानसभा निवडणुकीत प्रचंड वाद निर्माण झालेला ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा नवनीत राणांनी पुन्हा उचलला. अकोटच्या सभेत त्या म्हणाल्या, “इसबार ना कटना है, ना बटना है… एक रहना है और सेफ भी रहना है.” हा नारा ऐकताच सभेत प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजप पुन्हा हाच ध्रुवीकरणाचा मुद्दा पुढे आणत असल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींना थेट आव्हान

नवनीत राणांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना खुलेआम आव्हान दिले. त्या म्हणाल्या, “राहुल गांधींनी संविधानाचे पुस्तक हाती न घेता एकही कलम तोंडपाट म्हणून दाखवावे. जर ते हे करू शकलेच तर मी राजकारण सोडून देईन.”

पुढे त्या म्हणाल्या, “राहुल गांधी संविधानाच्या नावाने देशाची दिशाभूल करतात. त्यामुळेच माझ्यासारख्या उमेदवारांचा कमी मतांनी पराभव झाला. आता ते मतचोरी झाल्याचे सांगतात, मग आमचा पराभव कसा झाला?” असंही नवनीत राणा यांनी म्हटले.

“रामजी के साथ मत लढना”

राणा पुढे म्हणाल्या, “कोणाशीही लढा, पण रामजींशी लढू नका. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानते. बाकीचे कितीही आले आणि गेले. जर पाकिस्तानने राम मंदिराकडे बोट दाखवले तर त्यांची बोटं कापून टाकीन”, असा इशारा त्यांनी दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!