Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘तो थर्ड क्लास माणूस आहे…’; अंजली दमानिया कोणावर संतापल्या? वाचा सविस्तर बातमी

‘तो थर्ड क्लास माणूस आहे…’; अंजली दमानिया कोणावर संतापल्या? वाचा सविस्तर बातमी

Anjali Damania On Dhananjay Munde: महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत मित्रपक्षातील कुरघोड्या तसेच विरोधकांच्या गटांमधील तणाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा निशाणा साधला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि काही राजकीय कुटुंबांवर गंभीर टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात पार्थ पवार यांना संरक्षण देण्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, यंत्रणांकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने एफआयआर नोंदवत आला नाही. जर सामान्य व्यक्ती असेल, तर लगेच एफआयआर नोंदवला जातो, पण पार्थ पवार असल्यामुळे कायदा हाताळला जात नाही, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

हेही वाचा –Anjali Damania News: अंजली दमानियांची आजित पवारांवर बोचरी टीका; म्हणाल्या, ‘राज्यावर 9 लाख कोटींच कर्ज अन् अर्थमंत्री मात्र दहावी पास…’

अंजली दमानिया यांनी पुढे म्हटलं आहे की, खर्गे समितीला पुरावे दिले गेले असून, वीज बिल पार्थ पवारांच्या नावावर आहे. इओडब्ल्यूच्या तक्रारींमध्ये शितल तेजवानी यांचे सर्व पुरावे मिसाळ कडे आहेत. कोण खरा सहभागी आहे, कोण सूत्रधार आहे हे तपासावे. पार्थ पवारांवर गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी गौरी पालवे आत्महत्या प्रकरणावरही तीव्र मत व्यक्त केले. त्यांच्या मते, आरोपी दीर अजय आणि ननंद शीतल यांना चौकशीसाठी बोलावले गेले नाही. गौरीच्या आई-वडिलांना न्याय मिळत नाही. आई-वडिलांचा दावा गंभीर आहे. मारहाण आणि धमक्यांचा आरोप आहे. याबाबत महिला आयोगाने त्वरित पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी पंकजा मुंडेंना यामध्ये राजकारण करू नये, असा सल्लाही दिला.

धनंजय मुंडे यांच्यावर तगादा

दरम्यान, अंजली दमानियाने धनंजय मुंडे यांच्यावरही तीव्र टीका केली आहे. ‘त्यांचे विधान ऐकून संताप आला. हे थर्ड क्लास व्यक्तिमत्व आहे. एवढं सगळं होऊनही जर त्यांना आठवण येत असेल तर बोलायला शब्द नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!