Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंना कोर्टाचा मोठा झटका! सदनिका गैरव्यवहार प्रकरणी सुनावली 2 वर्षांची शिक्षा

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंना कोर्टाचा मोठा झटका! सदनिका गैरव्यवहार प्रकरणी सुनावली 2 वर्षांची शिक्षा

Manikrao Kokate News: सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषी खाते गमावलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा गंभीर अडचणीत सापडले आहेत. तब्बल तीन दशकांपूर्वीच्या शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे संकट घोंघावत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना या निर्णयामुळे आमदारकीसह मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या सदनिकांसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याच्या आरोपाखाली मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्या वेळी न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. निकालानंतर काही तासांतच जामीन मंजूर झाल्याने तत्कालीन काळात त्यांचे मंत्रीपद अबाधित राहिले होते. मात्र, आता जिल्हा सत्र न्यायालयानेही तोच निकाल कायम ठेवल्याने प्रकरण निर्णायक वळणावर आले आहे.

विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी?

या शिक्षेच्या पुष्टीमुळे विरोधी पक्षांकडून नैतिकतेच्या मुद्द्यावरून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, सरकार यावर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Manikrao Kokate News : रोहित पवारांनी माफी मागावी; ‘त्या’ प्रकरणात माणिकराव कोकाटेंचा कोर्टात युक्तवाद

काय आहे नेमंक प्रकरण?

दरम्यान, १९९५ ते १९९७ या कालावधीत राज्य सरकारच्या १० टक्के आरक्षित कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी उत्पन्नाबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीचे पुरावे सादर केल्यानंतर कारवाई सुरू झाली. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये गुन्हे दाखल झाले. जवळपास ३० वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट राहिले. अखेर प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता जिल्हा सत्र न्यायालयानेही तोच निर्णय कायम ठेवला आहे.

हेही वाचा – भाजप बाटलेला पक्ष अन् फोडाफोडीचा ‘बॅटमेन’, निष्ठावंतांना घरी बसवतो; मंत्री माणिकराव कोकाटेंची झणझणीत टीका

तथापी, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रम्मी खेळतानाच्या प्रकरणामुळे आधीच वादात सापडले होते. त्यानंतर त्यांच्याकडील कृषिमंत्रीपद काढून घेण्यात आले आणि युवक कल्याण व क्रीडाखात्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र, आता सदनिका गैरव्यवहार प्रकरणातील न्यायालयीन निर्णयामुळे त्यांची राजकीय वाटचाल पुन्हा एकदा कठीण वळणावर आली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!