Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण! दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र; भाजपची डोकेदुखी वाढली

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण! दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र; भाजपची डोकेदुखी वाढली

Lonavala Municipal Council: लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय बदल घडला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला बिनशर्त पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून भाजपविरुद्ध संयुक्त लढत उभारली जाणार आहे.

अधिकृत माहितीनुसार, फक्त प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही गटांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तिथे उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहतील, परंतु उर्वरित सर्व प्रभागांमध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते अजित पवार गटाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. दोन्ही गटांची मतशक्ती एकत्र आल्याने भाजपला मोठा फटका बसू शकतो, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – रायगडमध्ये राजकीय भूंकप! सुनील तटकरे भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा दावा

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, शरद पवार गटाने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेचा आम्ही आदर करतो. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना योग्य स्थान मिळेल. लोणावळा नगरपालिका, वडगाव नगरपंचायत आणि इतर शासकीय समित्यांमध्येही दोन्ही गटांच्या सहकार्याने सकारात्मक निर्णय घेतले जातील. शेळके यांनी विश्वास व्यक्त केला की शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग आगामी महापालिका निवडणुकांमध्येही त्यांच्यासोबत राहील. लोणावळ्यात तयार झालेलं हे नव्या मैत्रीचं समीकरण आगामी निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरू शकतं. काँग्रेसच्या दोन्ही गटांनी हातमिळवणी केल्यामुळे भाजपसमोर कठीण आव्हान उभं राहणार असून, आता अंतिम निकालाची उत्सुकता वाढली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!