इंदापूर : इंदापूर इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असून यामध्ये एकूण १० प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी ५६ उमेदवार तर अध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार यांनी निवडणूक लढवली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मतदानाकरीता वापरण्यात आलेली मतदान यंत्रे (ई. व्ही.एम.) मशीन इंदापूर कालठण रोड शासकीय धान्य गोडाऊन येथील स्ट्रॉगरूम मध्ये सीलचंद करून ठेवण्यात आले. असून त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
हेही वाचा – Indapur: इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे ठरली दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी
इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल मतमोजणी रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजले पासून सुरू होणार आहे. सदरची मतमोजणी ही शासकीय धान्य गोडाऊन कालठण रोड इंदापूर येथे पार पडणार आहे. यामध्ये पोस्टल मतदानासाठी १ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतमोजणी प्रक्रियेसाठी सुमारे ९५ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून १० मतमोजणी टेबल संख्या यामध्ये असणार आहे.
हेही वाचा – Indapur Depot: संत बाळुमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा; इंदापूर-आदमापूर थेट बससेवा सुरू
मतमोजणी कर्मचारी अधिकारी यांना एक दिवस अगोदर २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता. प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर प्रवेशासाठी अधिकृत ओळखपत्र असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी पत्रकार यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर मागाडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश ढगे यांनी यावेळी सांगितले.


