नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, कंपन्याकडूनही आपल्या ग्राहकांना चांगले फीचर्स दिले जात आहेत. त्यातच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) वर चालणाऱ्या सर्व स्मार्टफोनना लवकरच एक अद्भुत सुविधा मिळणार आहे. या सुविधाला क्विक शेअर असे नाव दिले गेले आहे. ही सर्व्हिस यापूर्वी महागड्या फोनमध्ये मिळत होती. मात्र, आता अनेक फोनमध्ये मिळणार आहे.
नव्या फीचर्सच्या माध्यमातून तुम्हाला इंटरनेटशिवाय ३० फूट अंतरावरूनही फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, संपर्क किंवा इतर फाईल्स पाठवता येतील. एअरड्रॉप सुविधा पूर्वी फक्त पिक्सेल १० सीरीजमध्ये उपलब्ध होती आणि आता ही सुविधा वाढविण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ती सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध होईल. भारतात पिक्सेल १० प्रोची किंमत १.०९ लाख रुपये आहे. एअरड्रॉपसह क्विक शेअरिंगला सपोर्ट करण्यासाठी एक वेगळे अॅप विकसित केले जाईल. हे अॅप प्ले स्टोअरद्वारे उपलब्ध केले जाईल. एअरड्रॉपशी संबंधित आवश्यक असलेले युजर्सच अॅप आणू शकतील.
अॅपलचे एअरड्रॉप फीचर तुम्हाला स्मार्टफोनवर कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा कॉन्टॅक्ट शेअर करण्याची सुविधा देते. ते तुम्हाला ३० फूट अंतरापर्यंत स्मार्टफोनवर डेटा पाठवण्याची मुभा असेल. मात्र, गोपनीयतेच्या उद्देशाने, त्यात संपर्क पाठवा आणि प्राप्त करा असे पर्याय देखील समाविष्ट आहेत.


