Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निवडणूक आयोग म्हणजे भाजपची ‘B-Team’; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा

निवडणूक आयोग म्हणजे भाजपची ‘B-Team’; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा

Vijay Wadettiwar On Election Commission: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. निवडणूक आयोग ही भाजपची ‘B-Team’ बनली असून, लोकशाहीची थट्टा सुरू आहे, अशा तिखट शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. शनिवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, सध्याचा आयोग अत्यंत सुस्त आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे. बोगस मतदान आणि मतचोरी रोखण्यात आयोग अपयशी ठरला असून, केवळ निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापलीकडे त्यांना काहीही देणेघेणे उरलेले नाही.

त्र्यंबकेश्वरमध्ये ‘एक मत, ५० हजार रुपये’

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप एका मताला ५० हजार रुपये वाटत असल्याचा दावा त्यांनी केला. एका छोट्या नगरपरिषदेसाठी भाजप ४० कोटी रुपये खर्च करत असून, हा सर्व पैसा सरकारी तिजोरीतील लुटीचा असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Sanjay Raut : सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे; राहुल गांधींमुळे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

मुंबईतील १५ लाख ‘बोगस’ मतदारांचा दावा

मुंबईत तब्बल 15 लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला. एकाच मतदाराचे नाव ३-४ वेळा असूनही तक्रार करूनही आयोग कोणतीही कारवाई करत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मध्य प्रदेशातील एका जुन्या घटनेचा दाखला देत, भाजपने बंदुकीच्या जोरावर जिल्हाधिकाऱ्यांकडून निकाल फिरवून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

धर्माबादमधील मतदारांचे ‘अपहरण’

नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांनी हजारो मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. पराभव समोर दिसू लागला की भाजप कुणाचा जीव घेण्यापर्यंत किंवा कुणालाही डांबून ठेवण्यापर्यंत मजल मारते, असे ते म्हणाले. एका मतदाराला ५ हजार रुपये वाटले जात असून हे ‘खोके’ कुठून आले, असा सवाल त्यांनी विचारला.

हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार; विजय वडेट्टीवार याची घोषणा

अजित पवारांची ‘स्वबळाची’ चाल भाजपचीच रणनीती

अजित पवार यांनी महायुतीबाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढवणे ही भाजपचीच एक रणनीती असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपनेच त्यांना ही स्क्रिप्ट लिहून दिली असल्याचा दावा त्यांनी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!