Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chandrakant Patil on Ajit Pawar: ‘जनता खुळी नाही’, चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर पुन्हा डागली तोफ; 2001 पासूनचं सगळंच काढलं

Chandrakant Patil on Ajit Pawar: ‘जनता खुळी नाही’, चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर पुन्हा डागली तोफ; 2001 पासूनचं सगळंच काढलं

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये आता सत्तेत एकत्र असलेले पक्षही आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात, पुणे आणि पिपंरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा रंगला आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगतोय. त्यामुळे आरोपांना चांगलीच धार आली आहे. अजित पवारांनी भाजपचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यानं संतापलेल्या भाजपनं अजित पवारांवर तोफ डागली. अजितदादा, दमानं घेऊ नका आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहे हे विसरू नका असा थेट इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. आता, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली.

देवाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, असे म्हणत भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. पुण्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित प्रचारसभेत बोलताना पाटील यांनी अजित पवारांच्या कार्यकाळात पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय विकास झाला, असा सवाल उपस्थित केला. तसेच, पुणे मेट्रो आणि उड्डाण पूल हे आमच्या काळात झाले. नगरपालिका निवडणुकीत आपण विजय मिळवला, आता 15 तारखेला मतदान करुन पुण्यात भाजपचा महापौर होणार आहे, असेही पाटील यांनी म्हटले.

अजितदादा म्हणाले की, पिंपरी आणि पुण्यामध्ये विकास झाला नाही, मग अजित दादा अगोदर सत्ता तुमची होती, तेव्हा विकास का केला नाही. आता, महाविकास आघाडी विकास करायला पुढे आली आहे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. अजित पवार अनेक वर्ष सत्तेत असताना आम्हाला प्रश्न विचारतात, पाच वर्षात तुम्ही काय केले? त्यांना अनेक कामांच्या यादी सांगता येतील, अजित दादा जनता खुळी नाही. उड्डाणपूल आणि मेट्रो करायला अजित दादा उशीर का झाला? मेट्रो आम्ही आणली, तुमची नुसती कागदावर राहिली. पुण्यात तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत मेट्रो करू शकला नाहीत. तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? मात्र आता जनता तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही काय केलं? असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.

पुण्यात पर्यटक वाढतील, पुणे शहर सेंटर झाले आहे. पुणेकर दोन महापालिकेचं पाणी एकटे वापरतात असे बोलले जायचे. कारण, पाणी वाटण्यात विषमता होती. पण, आता महापालिकेचा निर्णय झाला असून 24 बाय 7 पाणी योजना सुरू केली आहे, लवकरच ती पूर्ण झाल्यावर समान पाणीपुरवठा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पुण्यात तीन हजार कोटी रुपयांची काम 24 बाय 7 तासांमधून सुरू आहेत, जायका प्रकल्प सुरू आहे 2 हजार कोटी रुपयांचे. काय केलं सांगणार नाही, तर काय करणार हे सांगणार आहे. देशातील पहिले व्हायब्रंट शहर पुण्याला करणार आहे, मेट्रो शहर करणार आहे. 2030 पुण्याचा कॅपिटल प्लॅन तयार केला आहे, 44 हजार कोटी रुपये खर्च करणार असून वाहतूक आणि इतर व्यवस्थेसाठी हा पैसा खर्च केला जाईल. तो प्लॅन लवकर आपल्यासमोर मांडू, असे पुणेकरांना उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पुणे ग्रोथ हब तयार करू, पुण्याची ग्रोथ चार पटीने वाढली पाहिजे असा आमचा मानस आहे. येथे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. येथील वाहतूक कासवगतीने पुढे जात आहे, सर्वात कमी रस्ते आहेत, 9 टक्के रस्ते आहेत, शहरात रस्ते वाढले पाहिजे. रस्ते नियोजन कोणी केले, ज्यांनी नियोजन केले त्यात मी जात नाही, राजकारणात मी जात नाही, 32 टक्के वाहतूक आहे, जास्त वाहतूक आहे. राज्यात सर्वात कमी गतीने वाहतूक पुण्यात चालते, असेही फडणवीसांनी सांगितले.

मेट्रो जाळं, इलेक्ट्रिक बसेस, 32 रस्ते केले जाणार आहेत, एआयचा वापर करून आपण वाहतूक व्यवस्थित सुधार करणार आहोत, 13 उड्डाणपूल केले जाणार आहेत. पुण्याचा प्रोब्लेम आहे तो म्हणजे उत्तर-दक्षिण पुणे कमी आहे. आता, पुण्याला नव्याने जागा नाही घेऊ शकत. पुणे वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी पाताळात जाण्याचा निर्णय घेतला आहे, 54 किलोमीटर टनेल करणार आहोत, पहिला मार्ग कात्रजपासून सुरू करणार आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले. मी हवेत बोलत नाही, माझ्याकडे सगळे प्लॅन तयार आहेत, रिंगचं रोड काम सुरू केलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!