Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanskar Khilare: इंदापूरच्या लेकाची राष्ट्रीय स्तरावर गवसणी! तिरंदाजीत संस्कार खिलारेला रौप्य पदक

Sanskar Khilare: इंदापूरच्या लेकाची राष्ट्रीय स्तरावर गवसणी! तिरंदाजीत संस्कार खिलारेला रौप्य पदक

Sanskar Khilare: इंदापूर तालुक्यातील क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुरुकुल गोखळी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी संस्कार संजय खिलारे याने झारखंड राज्यातील रांची येथे पार पडलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात रौप्य पदक (Silver Medal) पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

अंतिम फेरीत अटीतटीची लढत
रांची येथील बिरसा मुंडा ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. देशभरातील निवडक आणि दर्जेदार खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. संस्कारने भारतीय फेरीतील (Indian Round) वैयक्तिक एलिमिनेशन प्रकारात आपल्या अचूक कौशल्याचे आणि मानसिक स्थैर्याचे दर्शन घडवले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम फेरीत त्याने रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

प्रशिक्षक आणि पालकांचे मोलाचे सहकार्य
संस्कार हा अभ्यासात हुशार असूनही त्याने क्रीडा क्षेत्रात सातत्य राखले आहे. प्रशिक्षक जुबेर पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तिरंदाजीचा सराव पूर्ण केला. या यशात त्याचे वडील संजय खिलारे आणि माता सुप्रिया खिलारे यांचा पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरला आहे.

हेही वाचा – Tanishka Phalphale: इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! तनिष्का आत्माराम फलफले हिची ‘इस्रो’मध्ये निवड

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
संस्कारच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल गुरुकुल गोखळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण हरणावळ, मुख्याध्यापक विश्वास हुलगे, प्राथमिक विभाग प्रमुख सुरेश वरकड आणि माध्यमिक विभाग प्रमुख रमेश गोफणे यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. इंदापूर तालुक्यातून आणि क्रीडा क्षेत्रातून संस्कारवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!