Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपूर्वी कर्जमाफी होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपूर्वी कर्जमाफी होणार;  कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Farmer Loan Waiver : राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सरकारने आधीच घेतला असून, येत्या ३० जूनपूर्वी प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वाची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.

एप्रिलमध्ये येणार समितीचा अहवाल
कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू आहेत. मंत्री भरणे यांनी सांगितले की, सध्या पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून एप्रिलपर्यंत ते पूर्ण होईल. या प्रक्रियेसाठी ‘परदेशी’ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल. आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील, ज्यामध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक तरतुदींचे सूतोवाच केले जाऊ शकते.

हेही वाचा –मोठी बातमी..! राज्यातील गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही भरणे यांनी भाष्य केले. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी अनेक आमदारांची इच्छा असली, तरी सध्या पवार कुटुंब दुःखात असल्याचे त्यांनी सांगितले. तेराव्या दिवसानंतर सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून चर्चा करतील. सध्या केवळ सांत्वनासाठी आम्ही भेट घेत आहोत, राजकीय चर्चेसाठी ही योग्य वेळ नाही, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

‘इंदापूरचा विकास आणि घड्याळावर विश्वास’
इंदापूरच्या राजकारणावर बोलताना भरणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. इंदापूरची जनता केवळ भाषणांना भुलणारी नाही, तर ती विकासकामांना महत्त्व देते. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (घड्याळ चिन्ह) सर्व उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अजितदादांच्या पश्चात राज्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पक्ष एकजुटीने काम करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!