पुणे : तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आपल्यापैकी काही जणांनी अनेक परीक्षा, मुलाखतीही दिल्या असतील तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर, 2025 ही असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी मा. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी-दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 20000 ते 50000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


