पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू केलेल्या संघर्षात मुंबईत झालेल्या आंदोलक मोहिमेला यश मिळाले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर जारी केला आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी मोठ्या विजयासमान मानला जात आहे.
यावर्षी पुढील टप्प्यात सातारा गॅझेट लागू होण्याची शक्यता आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. मराठा समाजाचे वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. त्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला असून, देशभरातील मराठा समाजाचे प्रतिनिधी लवकरच दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत. अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. ही घोषणा धाराशिव येथे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केली.
हेही वाचा – शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; गोपीचंद पडळकरांचा जोरदार हल्लाबोल
दरम्यान, मुंबईतील आंदोलनापूर्वी त्यांनी उपोषणाची सुरुवात केली होती, ज्यामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. आंदोलनाच्या यशानंतर सरकारने काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्यांसाठी वेळ मागितला आहे. मराठा समाजाची मुख्य मागणी, म्हणजे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करणे, सरकारने आता ही मागणी मंजूर केली आहे.
हेही वाचा – बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालं! बीड रेल्वे सेवेला आज हिरवा झेंडा
मराठा – ओबीसी संघर्ष
हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी झाल्यानंतर राज्यातील ओबीसी समाजाने विरोधाची भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाचा दावा आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही त्यांच्यासमोर अन्यायकारक ठरेल. याशिवाय, बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील या गॅझेटवरून विरोधात आले आहेत. बंजारा समाजाचे प्रतिनिधी म्हणतात की, त्यांना एसटीमध्ये समावेश करावा. मराठा समाजासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर आता दिल्लीमध्ये होणारे अधिवेशन हे आरक्षणाच्या लढ्याचा पुढचा टप्पा ठरणार आहे.


