Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील गुरुवार पेठेत चोरट्यांचा 70 किलो चांदीवर डल्ला; आरोपी अटकेत

पुण्यातील गुरुवार पेठेत चोरट्यांचा 70 किलो चांदीवर डल्ला; आरोपी अटकेत

Pune Crime: पुण्यातील गुरुवार पेठेतील एका 40 वर्ष जुन्या सराफी पेढीवर काही दिवसांपूर्वी झालेल्या धाडसी चोरीचा पोलिसांनी छडा लावला आहे. तब्बल 70 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या आरोपींपैकी एका आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक करणाऱ्या आली आहे. आरोपीकडून 36 किलो 442 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा – Pune Crime : आधी बायकोचा खून, नंतर नवऱ्यानं स्वत:ला संपवलं, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुणे हादरलं

अटक केलेल्या 36 वर्षीय आरोपीचे नाव राजेश सरोज असून, तो उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील कुंडाखचा रहिवासी आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सप्टेंबरच्या 14 आणि 15 तारखेला मध्यरात्री चोरट्यांनी गुरुवार पेठेतील सराफी पेढीवर डल्ला मारला होता. या चोरीत तब्बल 67.6 लाख रुपये किमतीची चांदी आणि 5 लाख रुपये रोकड लंपास करण्यात आली होती. चोरट्यांनी तीन पोती भरून चांदी चोरली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हेही वाचा – Pune Traffic Update : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी..! आज ‘या’ मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद; पर्यायी मार्ग कोणते?

पोलीसांनी घटनास्थळ आणि आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तांत्रिक तपासणी करून आरोपींचा मागोवा घेतला. तपासात समोर आले की, आरोपींनी पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशनवरून उत्तर प्रदेशला पळ काढला होता. या माहितीच्या आधारे खडक पोलीसांनी उत्तर प्रदेशातून राजेश सरोजला अटक केली आणि त्याच्याकडून चोरीची मोठी प्रमाणात चांदी जप्त केली. सध्या पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत आणि बाकीचा ऐवज ताब्यात आणण्यासाठी कारवाई सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!