पुणे : तुमच्यापैकी अनेकांचा चांगली नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न असेल. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आता मंत्रालयात नोकरी मिळू शकणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय येथे वाहनचालक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड अनुभव आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी कार्यासन नापु-११, दालन क्र. २१९ (विस्तार), २ रा मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.mahafood.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


