Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हुंड्यात बुलेट न मिळाल्याने नववधूला तिहेरी तलाक; सासरच्यांवर गुन्हा दाखल

हुंड्यात बुलेट न मिळाल्याने नववधूला तिहेरी तलाक; सासरच्यांवर गुन्हा दाखल

Triple Talaq Case: ठाणे जिल्ह्यात तिहेरी तलाकचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला असून, हुंड्यात बुलेट मोटारसायकल न मिळाल्यामुळे एका नववधूला लग्नानंतर तीन दिवसातच पतीने घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणीने भिवंडी तहसील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे.

लग्नानंतर काही दिवसांतच छळाची सुरुवात

१९ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील मोहम्मद रशीद याच्याशी २५ वर्षीय पीडितेचे लग्न झाले. लग्नानंतर ती पतीच्या सुलतानपूर जिल्ह्यातील नान्हुई येथे राहायला गेली. तेथे गेल्यानंतर काहीच दिवसात सासरच्या मंडळींकडून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास सुरू झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

हेही वाचा – नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्यांकडून पैशांची मागणी; 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

‘बुलेट’ची मागणी न पूर्ण झाल्याने छळ वाढला

तक्रारीत पीडितेने नमूद केल्यानुसार, तिच्या कुटुंबाने सोन्याचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरगुती सामान यांसह सर्व आवश्यक भेटवस्तू दिल्या होत्या. मात्र तरीही सासरच्या लोकांनी समाधान न मानता, हुंडा म्हणून बुलेट मोटारसायकल आणण्याचा दबाव टाकला. ही मागणी नाकारताच महिलेवरील अत्याचार अधिक तीव्र झाल्याचे पीडितेने सांगितले.

हेही वाचा – Nashik Crime: नाशिकमध्ये नवविवाहितेची विषप्राशन करून आत्महत्या; 7 पानांच्या सुसाईड नोटमध्ये केले खळबळजनक आरोप

फक्त तीन दिवसात तिहेरी तलाक

२१ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या पतीने तिला मारहाण करत तिहेरी तलाकचा उच्चार केला आणि जबरदस्तीने तिला घराबाहेर काढले. २०१९ च्या कायद्यानुसार तिहेरी तलाक बेकायदेशीर आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पती मोहम्मद रशीद, त्याचे आई-वडील आणि दोन बहिणी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 85 (क्रूरता) आणि 115 (दुखापत), तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायदा आणि मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) अधिनियम 2019 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकरणाची तपास प्रक्रिया सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे तिहेरी तलाकावर कायदेशीर बंदी असूनही अशा घटना कशा घडतात, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!