Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कारला धक्का लागल्याने नवी मुंबईतून ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या आईवर गंभीर आरोप

कारला धक्का लागल्याने नवी मुंबईतून ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या आईवर गंभीर आरोप

पुणे: पूजा खेडकर यांच्या आईचा नवा कारनामा समोर आला आहे. नवी मुंबईत ऐरोली सिग्नलजवळ घडलेल्या एका अपघातानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रकचा एका कारला धक्का बसला आणि त्यानंतर कारमधून उतरलेल्या दोन लोकांनी ट्रकचालकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. काही वेळानंतर चालक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली.

तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ट्रकचालक प्रल्हाद कुमार याला थेट पुण्यातील चतुश्रृंगी परिसरात, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरच्या घरात डांबून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चालकाची सुरक्षित सुटका केली.

दरम्यान, चौकशीसाठी पोहोचलेल्या पोलिसांशी मनोरमा खेडकर यांनी उघडपणे हुज्जत घातली. त्यांनी घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला आणि अधिकाऱ्यांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेर पोलिसांना त्यांना समन्स बजावावे लागले.

अपघातानंतर घटनास्थळी वाद तसेच धक्काबुक्की झाली होती. ऐरोली सिग्नलवर मिक्सर ट्रकने (MH12 RT5000) कारला धडक दिली होती. ही कार मनोरमा खेडकर यांची असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर कारमधून उतरलेल्या व्यक्तींनी चालकाला जबरदस्ती पळवून नेले आणि थेट पुण्यातील घरात कैद केले. सध्या, या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून मनोरमा खेडकर यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!