नवी दिल्ली : भारतात २२ सप्टेंबरपासून ग्राहकांना जीएसटी कपातीचा फायदा मिळणार आहे. कारण, याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कंपन्यांनी दर कपातीची घोषणाही सुरू केली आहे आणि शक्य तितक्या लवकर नवीन स्टॉक बाजारात आणला जात आहे. दरम्यान, एफएमसीजी कंपन्यांनी ५, १०, २० रुपयांच्या चिप्स, कुरकुरे, बिस्किटे, नमकीन, साबण आणि टूथपेस्टच्या किमती बदलतील की नाही याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
५ रुपयांची बिस्किटे, १० रुपयांचा साबण किंवा २० रुपयांच्या टूथपेस्ट पॅकसारख्या लोकप्रिय कमी किमतीच्या उत्पादनांच्या किमती कमी करू शकत नाहीत, जरी या वस्तूंवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी केला गेला असला तरी किमतीत फरत दिसून येणार नाही. एका अहवालानुसार, भारतीय खरेदीदारांना या निश्चित किमतींची सवय झाली आहे आणि किंमती १८ किंवा ९ रुपयांपर्यंत कमी केल्याने ग्राहकांना गोंधळ होईल आणि पैशांच्या व्यवहारातही गैरसोय होईल. त्याऐवजी, कंपन्यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाला (CBIC) सांगितले की, ते किंमती समान ठेवतील, परंतु पॅकमधील प्रमाण वाढवतील.
कंपनी त्यांच्या लहान ‘इम्पल्स पॅक’चे वजन वाढवेल जेणेकरून खरेदीदारांना अधिक फायदे मिळू शकतील. त्याचप्रमाणे कंपन्या कर कपातीचे फायदे ग्राहकांना निश्चितपणे देतील आणि स्वस्त कर रोजच्या उत्पादनांची मागणी वाढवेल, असेही म्हटले आहे.


