महाराष्ट्र जागरण डेस्क: ‘बंदिश बँडिट्स सीझन २’ रिलीज झाल्यापासून खूप गाजत आहे आणि शोची मुख्य अभिनेत्री श्रेया चौधरी सध्या चर्चेत आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेरणादायक फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे ती चर्चेत आली होती. तारुण्यात श्रेया तिच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त होती, ज्यामुळे तिला आत्मविश्वासाचा अभाव जाणवत असे. पण तिच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले, जेव्हा तिने तिच्या आदर्श हृतिक रोशनला त्याच्या फिटनेस प्रवासाबद्दल खुलेपणाने बोलताना पाहिले.
श्रेया म्हणते, मी लहानपणी नेहमी वर्गातली ‘जाड’ मुलगी होते. मला वाटायचे की, काहीही केले तरी माझे वजन कमी होत नाही. कदाचित मला योग्य प्रेरणा नव्हती. मग माझ्या आयुष्यात हतिक रोशन आला. एक फॅन गर्ल म्हणून, त्यांचा फिटनेस प्रवास खूप प्रेरणादायक ‘होता. तो त्याच्या अडचणीबद्दल आणि त्या कशा पार केल्या, याबद्दल जेव्हा बोलला, तेव्हा मला वाटले की, मी देखील एक दिवस जिंकू शकते. श्रेयाने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे काही प्रेरणादायक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले ‘कहाणीचा वेळ – मी माझ्या प्रत्येक वर्जनवर प्रेम करते.
प्रत्येक जण मला त्या वेळच्या मानसिक प्रवासाची जाणीव करून देतो. ना पश्चात्ताप, ना मागे वळून पाहणे. मी अधिक हुशार आणि खंबीर बनले आहे. मी फिट होण्याचे ठरवले, तेव्हा फक्त माझ्या आरोग्यासाठी ठरवले होते. खूप गोष्टी चालू होत्या आणि सतत फिटनेससाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जात होता. मग हृतिक रोशनचे म्हणणे ऐकले. तो माझ्या लहानपणापासूनचा क्रश आहे आणि माझ्या फिटनेस प्रवासासाठी मी त्याला श्रेय देते, असे ती म्हणाली.


