Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! 24 वर्षीय उमेदवाराचा झोपेतच मृत्यू

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! 24 वर्षीय उमेदवाराचा झोपेतच मृत्यू

नाशिक: मनमाड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शहराला हादरवून टाकणारी घटना घडली असून प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मधील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार नितीन वाघमारे यांचे सोमवारी उशिरा रात्री अचानक निधन झाले. जोरदार प्रचार मोहिमेनंतर घरी परतून विश्रांती घेत असताना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असावे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. फक्त २४ वर्षांच्या उमेदवाराचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नितीन वाघमारे हे तरुण, उत्साही आणि संपर्कात राहणारे उमेदवार म्हणून ओळखले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रभागात सक्रिय प्रचाराला सुरूवात केली होती. नागरिकांशी संवाद, पदयात्रा आणि बैठकांच्या माध्यमातून त्यांनी प्रचार वेगाने वाढवला होता. मात्र अतोनात कामाचा ताण आणि धावपळीच्या काळातच हा अनर्थ ओढवल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. निधनाची माहिती मिळताच विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक धाव घेऊन वाघमारे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. तरुण वयात त्यांचा झालेला मृत्यू ही मनमाड शहरासाठी मोठी हानी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा –नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार! अद्वय हिरेंसह राजू शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश

निवडणूक जाहीर असताना अधिकृत उमेदवाराच्या निधनामुळे आता प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मधील निवडणुकीचा कार्यक्रम बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित वॉर्डमध्ये मतदानाची तारीख पुढे ढकलली जाणार का, नव्याने अधिसूचना निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनमाड शहरातील राजकीय वातावरण तापलेले असताना या दुर्दैवी घटनेने निवडणूक प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!