Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Imtiaz Jalil : मुस्लिम समाज “छातीचा कोट” करून मनोज जरांगेंच्या पाठीशी : इम्तियाज जलील

Imtiaz Jalil : मुस्लिम समाज “छातीचा कोट” करून मनोज जरांगेंच्या पाठीशी : इम्तियाज जलील

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनाला आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे. जरांगे यांच्यावर पोलिसांनी बळजबरी केल्यास मुस्लिम समाज “छातीचा कोट” करून मराठा आंदोलकांच्या पाठीशी उभा राहील, असा थेट इशारा जलील यांनी मुंबई पोलिस आणि राज्य सरकारला दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवं बळ मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मुंबईत तणाव वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

“जरांगेंवर बळजबरी झाली तर मुस्लिम समाज पुढे असेल”, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य

इम्तियाज जलील यांनी आझाद मैदानात जरांगे यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाला MIM चा २००% पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यांनी म्हटलं, “सुरुवातीपासूनच मी आणि माझे पक्षप्रमुख बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उचलला आहे. जरांगे यांचं आंदोलन इतकं मोठं असतानाही सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. लवकरात लवकर याचा तोडगा काढावा. मी जरांगे यांचा मोठा चाहता आहे आणि त्यांच्यासोबत कायम आहे.”

जलील यांनी सरकार आणि मुंबई पोलिसांना उद्देशून म्हटलं, “जर तुम्ही जरांगे यांच्यावर बळजबरी केली किंवा आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला, तर मराठा समाज ज्या ताकदीने रस्त्यावर उतरेल, त्याच ताकदीने मुस्लिम समाजही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल. आंदोलन हा लोकशाहीचा मार्ग आहे. हरियाणा-पंजाबात शेतकरी आंदोलन महिनोनमहिने चाललं, शाहीनबागही महिनाभर चाललं. मग या आंदोलनामुळे सरकारला का भीती वाटते? पाच दिवसांत नोटीस देऊन ‘घरी जा’ असं सांगणं म्हणजे हुकूमशाही आहे, लोकशाही नाही.”

मराठा आमदार-खासदारांना राजीनाम्याचं आवाहन

जलील यांनी मराठा समाजाच्या नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले, “मराठा समाजाचे जवळपास १५० आमदार-खासदार आहेत, पण ते एसीमध्ये झोपतात, तर सामान्य मराठे रस्त्यावर त्रास सहन करतात. माझी विनंती आहे की, मराठा समाजाच्या सर्व आमदार-खासदारांनी जरांगे यांच्या चरणी राजीनामे टाकावेत आणि समाजाला खरी साथ द्यावी. यामुळे एक संदेश जाईल की त्यांना समाजाशी देणंघेणं आहे, खुर्चीशी नाही.”

त्यांनी पुढे म्हटलं, “मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी हायकोर्टाने ५% आरक्षण दिलं होतं. मी जरांगे यांना सांगितलं होतं की, आम्ही तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहोत. पण जेव्हा आम्ही आमच्या ५% आरक्षणासाठी लढाई सुरू करू, तेव्हा तुम्हीही तितक्याच ताकदीने आमच्या पाठीशी उभे राहा.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!