Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Khed News: खेडमध्ये भरदिवसा जादूटोणा? दही–भात, लिंबू, हळदकुंकू लावून…; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Khed News: खेडमध्ये भरदिवसा जादूटोणा? दही–भात, लिंबू, हळदकुंकू लावून…; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Khed News: आधूनिकतेच्या जगात अजूनही राज्यात जादु- टोणा, अंधश्रद्धेचा खेळ सुरु असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीवेळीही असे प्रकार उघडकीस आले होते. अशीच धक्कादायक घटना पुण्यातील खेड तालुक्यात घडली असून अख्ख्या गावात खळबळ उडाली आहे. जादू टोण्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे.

भर दुपारी जादूटोण्याचा प्रकार…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी घडलेल्या एका जादूटोणाच्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जादुटोणा करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आहे. बंद घराच्या दारात दही–भात, लिंबू, हळदकुंकू लावून नारळ फोडणारे संशयित कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

कडुस गावातील लोकवस्तीतील एका जुन्या बंद घरासमोर भर दुपारी एक पुरुष हातात पिशवी घेऊन आला. बंद घराच्या दारासमोर बसून त्या वृद्ध व्यक्तीने दही–भात, लिंबू ठेवून त्यावर हळद–कुंकू लावले, त्यानंतर नारळही फोडला. त्या पुरुषासोबत एक महिलाही दिसत आहे. हा प्रकार पाहून गावातील लोकही गोळा झाले.


गावकरी भयभीत…!
परिसरातील नागरिकांनी जेव्हा त्या वृद्ध व्यक्तीला याबाबत विचारलं, तेव्हा त्याने मुंबईहून आलोय असं सांगितले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. गावकऱ्यांच्या मते, या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू असून त्यातूनच हा जादूटोणा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गावकरी जमले, गर्दी झाली तरीही या व्यक्तीने न थांबता दारासमोर हळदी- कुंकुं मांडले. या विचित्र कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात अंधश्रद्धा आणि दहशतीची छाया पसरली आहे. परिसरातही या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!