Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे केस कापले; पुण्यातील प्रतिष्ठित शाळेवर गंभीर आरोप

पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे केस कापले; पुण्यातील प्रतिष्ठित शाळेवर गंभीर आरोप

Pune School Controversy: पुण्यातील प्रतिष्ठित कल्याणी शाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा प्रशासनाने पालकांची पूर्वसंमती न घेता विद्यार्थ्यांचे केस कापण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २:१५ या वेळेत इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून शाळेच्या आवारात आणण्यात आले. तिथे बोलावलेल्या न्हाव्यांनी विद्यार्थ्यांचे केस कापले. पालकांनी आरोप केला की, एकाच रेझर आणि कंगव्याचा वापर करून स्वच्छतेचे नियम पाळले गेले नाहीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय, प्रत्येक केसकापणीचा खर्च ३०० रुपये विद्यार्थ्यांच्या डिपॉझिटमधून वजा करण्यात आले.

या घटनेच्या आधी ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११:२५ वाजता पालकांना ईमेल पाठवण्यात आला होता. त्यात शाळेने म्हटले होते की, ‘वैयक्तिक सौंदर्य आणि शिस्त ही शाळेच्या मूल्यांचा भाग आहे. नियम न पाळल्यास केस कापले जातील. पालकांनी यावर आक्षेप घेत, रात्री उशिरा मेल पाठवून कोणतीही प्रतिक्रिया देण्याची संधीच दिली नाही, असे सांगितले. एका पालकाने संतप्तपणे विचारले, आमच्या मुलांच्या शरीराबद्दलचे निर्णय शाळा आमच्या संमतीशिवाय कसे घेऊ शकते?

पालक आणि कार्यकर्त्यांचा संताप

दुसऱ्या दिवशी शाळेत आलेल्या पालकांना प्रशासनाने भेटण्यास नकार दिला आणि ही बाब “अंतर्गत धोरणात्मक” असल्याचे सांगितले. पण ही गोष्ट सोशल मीडियावर पसरताच संतापाची लाट उसळली. बालहक्क कार्यकर्त्यांनी शाळेच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विद्यार्थ्यांच्या संमती, सन्मान आणि स्वच्छतेच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले.

हेही वाचा – पुणे पोलिसांच्या टार्गेटवर मारणे गँग; टोळीचा शार्प शूटर बनसोडेला घेतलं ताब्यात

शिक्षणतज्ज्ञांचा इशारा

शिक्षण तज्ञांनी या कृतीचा निषेध करत स्पष्ट केले की, शिस्त आणि नीतीमत्ता जपताना शाळेने विद्यार्थ्यांच्या संमतीचा आणि सन्मानाचा भंग करू नये. कोणतेही नियम पारदर्शक, लिंगनिरपेक्ष आणि पालकांच्या माहितीत असले पाहिजेत. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR) ने चौकशी सुरू केली आहे. अनेक पालक गटांनी औपचारिक तक्रारी दाखल केल्या असून, शाळा प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!