Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BJP–MIM Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; भाजपने ओवेसींच्या एमआयएमशी युती केली, सत्तेसाठी नवी राजकीय गणिते

BJP–MIM Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; भाजपने ओवेसींच्या एमआयएमशी युती केली, सत्तेसाठी नवी राजकीय गणिते

अकोट : ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी सर्व राजकीय भूमिका बाजूला ठेवल्या आहेत का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने थेट ओवेसींच्या एमआयएमशी युती केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नुकत्याच झालेल्या अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. मात्र, 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 35 पैकी 33 जागांसाठी निवडणूक झाली असून भाजपला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागले.

सत्तेसाठी ‘अकोट विकास मंच’ची स्थापना

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने आपल्या नेतृत्वाखाली ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला आहे. या आघाडीत भाजपनंतर सर्वाधिक म्हणजे 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा प्रमुख घटक ठरला आहे. याशिवाय या मंचात ठाकरे गटाची शिवसेना, शिदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी, शरद पवार गटाची राष्ट्रवादी, बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचा समावेश आहे. या नव्या आघाडीची नोंदणी नुकतीच अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

भाजपचा व्हिप सर्वांना बंधनकारक

भाजपचे नगरसेवक रवि ठाकूर हे या आघाडीचे गटनेते असतील. या मंचातील सर्व पक्षांच्या नगरसेवकांना आता भाजपचा व्हिप पाळावा लागणार आहे. 13 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणार आहे.

सध्याच्या 33 निवडून आलेल्या सदस्यांपैकी 25 नगरसेवक या आघाडीत असून नगराध्यक्षा माया धुळे या 26 व्या सदस्य आहेत. उर्वरित विरोधी बाकावर काँग्रेसचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक असणार आहेत.

एमआयएम पराभूत, तरी सत्तेत सहभागी

नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या फिरोजाबी सिकंदर राणा यांचा 5,271 मतांनी पराभव केला होता. मात्र, निवडणुकीनंतर सत्तेसाठी भाजप-एमआयएम युती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे नारे देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये एमआयएमसोबत हातमिळवणी केल्याने विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे.

अकोट नगरपालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा : 35

निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक प्रलंबित)

  • भाजप : 11
  • काँग्रेस : 6
  • एमआयएम : 5
  • प्रहार : 3
  • ठाकरे गट शिवसेना : 2
  • अजित पवार राष्ट्रवादी : 2
  • वंचित : 2
  • शिंदे गट शिवसेना : 1
  • शरद पवार राष्ट्रवादी : 1

‘अकोट विकास मंच’चे बलाबल

  • भाजप : 11
  • एमआयएम : 5
  • प्रहार : 3
  • ठाकरे गट शिवसेना : 2
  • अजित पवार राष्ट्रवादी : 2
  • शिंदे गट शिवसेना : 1
  • शरद पवार राष्ट्रवादी : 1
  • एकूण : 25 नगरसेवक

अंबरनाथमध्येही वेगळे समीकरण

अकोटनंतर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने शिंदे गटाला बाजूला ठेवत थेट काँग्रेससोबत युती केल्यानेही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपच्या या भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढल्याचे चित्र आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!