Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अनमोलप्रीत सिंगने अवघ्या ३५ चेंडूंत झळकावले शतक; लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वांत जलद शतक झळकावणारा भारतीय

अनमोलप्रीत सिंगने अवघ्या ३५ चेंडूंत झळकावले शतक; लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वांत जलद शतक झळकावणारा भारतीय

अहमदाबाद: विजय हजारे करंडक २०२४-२५ स्पर्धेच्या क गटातील सामन्यात शनिवारी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ झालेला पंजाबचा फलंदाज अनमोलप्रीत सिंगने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूंत शतक झळकावले. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वांत जलद शतक झळकावणारा अनमोलप्रीत हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ४५ चेंडूंत नाबाद ११५ धावा करताना तब्बल ९ षटकार आणि १२ चौकार लगावले.

त्याच्या बहारदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबने अरुणाचल प्रदेशवर खून ९ गडी राखून विजय मिळवला. पंजाबने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात १६५ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.५ षटकांत पूर्ण केले. पंजाबने नाणेफेक जिंकून अरुणाचलविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अरुणाचलने ४८.४ षटकांत सर्वबाद १६४ धावा केल्या. १६५ धावांचे लक्ष्य पंजाबने अवघे एक विकेट गमावून साकार केले. कर्णधार अभिषेक शर्मा १० धावांवर बाद झाल्यानंतर प्रभसिमरन सिंगने २५ चेंडूंत नाबाद ३५ धावा करत अनमोलप्रीतला मोलाची साथ दिली.

अनमोलप्रीतचे शतक हे लिस्ट ए इतिहासातील तिसरे वेगवान शतक ठरले. ऑस्ट्रेलियाचा जॅक फ्रे झर मॅकगर्क (२९ चेंडू) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स (३१ चेंडू) यांच्या नावावर सर्वाधिक वेगवान शतक आहेत. अनमोलप्रीतने भारताचा माजी फलंदाज युसूफ पठाणचा विक्रम मोडला. युसूफने २०१० मध्ये महाराष्ट्राविरुद्ध बडोद्याकडून खेळताना ४० चेंडूत शतक झळकावले होते. अनमोलप्रीतने केवळ ३५ चेंडूंत शतक झळकाविले. ४५ चेंडूंत १२ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ११५ धावांची जलद खेळी केली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!