Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एकनाथ खडसेंच्या घरातून CD आणि पेन ड्राईव्ह गायब; नाथाभाऊंचा खळबळजनक दावा

एकनाथ खडसेंच्या घरातून CD आणि पेन ड्राईव्ह गायब; नाथाभाऊंचा खळबळजनक दावा

जळगाव: ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी झालेल्या चोरीच्या घटनेने नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला या चोरटी प्रकरणात सोने, चांदी आणि रोकड चोरीला गेल्याचं समोर आलं होतं. मात्र आता खडसे यांनी स्वतःच एक खळबळजनक उघड केला आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून काही अत्यंत संवेदनशील कागदपत्रं, सीडी आणि पेनड्राइव्ह देखील उचलून नेली आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

सोनेच नव्हे, तर ‘माहिती’चाही खजिना लंपास

27 ऑक्टोबरच्या रात्री खडसेंच्या मुक्ताईनगरमधील बंगल्यात चोरी झाली. घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी सुमारे सहा ते सात तोळे सोने आणि ३५ हजारांची रोकड चोरून नेली. पण नंतर बारकाईने पाहणी केल्यावर खडसे यांना लक्षात आलं की, घरातून महत्त्वाच्या फाईल्स, सीडी आणि पेनड्राइव्ह देखील गायब आहेत. या वस्तूंमध्ये नेमकं काय होतं, यावरून आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, या चोरीमागचं उद्दिष्ट केवळ आर्थिक नसून काही गुप्त माहिती मिळवण्याचं असावं. माझ्या घरातून घेतलेल्या कागदपत्रांमध्ये काही भ्रष्टाचारसंबंधी माहिती होती, जी मी माहिती अधिकारातून मिळवली होती. त्यांनी पुढे सांगितलं की, या सीडी आणि पेनड्राइव्हमध्येही काही संवेदनशील माहिती होती. सीडी आणि पेनड्राइव्ह नक्की कोणत्या कारणाने चोरीस गेल्या, याचा तपास होणं गरजेचं आहे.

हेही वाचा – मोठी बातमी..! एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जबरी चोरी; कपाटं फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

खडसे यांनी संशय व्यक्त केला की, या चोरट्यांना घरातील वस्तूंचं अचूक ठिकाण माहित होतं. त्यामुळे ही साधी चोरी नसून, पूर्वनियोजित कारवाई असू शकते. त्यांनी हेही सांगितलं की, चोरी होण्यापूर्वी त्यांच्या घराच्या परिसरातील लाईट अचानक बंद झाली होती, आणि काही मिनिटांतच चोरट्यांनी डाव साधला. त्यामुळे पोलिसांनी या तांत्रिक बाबींचाही तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिस तपासावर खडसेंचा विश्वास

खडसे म्हणाले, राजकीय नेत्याच्या घरात चोरी होणं हे पोलिसांसाठीही प्रतिष्ठेचं प्रकरण आहे. मला खात्री आहे, पोलीस या घटनेचा छडा लावतील आणि या चोरीमागचा खरा हेतू उघड करतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!