Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अभिमानास्पद..! भारताने जपानला मागे टाकत बनला चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

अभिमानास्पद..! भारताने जपानला मागे टाकत बनला चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : भारताने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. सरकारच्या वर्षअखेर आर्थिक पुनरावलोकनानुसार, भारताचा नाममात्र जीडीपी (नॉमिनल जीडीपी) सुमारे ४.१८ ट्रिलियन डॉलर झाला असून, यामुळे भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा मान पटकावला आहे. ही घोषणा ३० डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारी प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली. यापूर्वी भारत पाचव्या क्रमांकावर होता.

वर्तमान क्रमवारी (नॉमिनल जीडीपीनुसार, २०२५ अखेर)

  • अमेरिका
  • चीन
  • जर्मनी
  • भारत ($४.१८ ट्रिलियन)
  • जपान

भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ८.२ टक्के दराने वाढला, जो मागील तिमाहीतील ७.८ टक्के आणि गेल्या वर्षातील ७.४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशांतर्गत मागणी, मजबूत संरचनात्मक सुधारणा आणि खाजगी यामुळे ही वाढ शक्य झाली आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चितता असूनही भारताची वाढ गती कायम आहे.

२०३० पर्यंतचा अंदाज :
सरकारच्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत भारताचा जीडीपी ७.३ ट्रिलियन डॉलर होईल. यामुळे भारत जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होईल.

आंतरराष्ट्रीय संस्थांचे अंदाज :

  • जागतिक बँक : २०२६ मध्ये ६.५ टक्के वाढ.
  • मूडीज : जी२० देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; २०२६ मध्ये ६.४ टक्के, २०२७ मध्ये ६.५ टक्के.
  • आयएमएफ : २०२५ मध्ये ६.६ टक्के, २०२६ मध्ये ६.२ टक्के.

ही कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. मजबूत आर्थिक नीती, सुधारणा आणि देशांतर्गत मागणीमुळे भारत जगाच्या आर्थिक नकाशावर वेगाने पुढे जात आहे. नवीन वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!