नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया ऍप सुरु आहेत. त्यात WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. WhatsApp हे एक बेस्ट असे ऍप ठरत आहे. WhatsApp चा दावा आहे की युजर्सचे चॅट्स एन्क्रिप्टेड आहेत. याचा अर्थ कंपनी किंवा इतर कोणीही तुमचे संभाषण वाचू शकत नाही. मात्र, या प्रकरणात एका ग्रुपने धक्कादायक दावा केला आहे.
व्हॉट्सअॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देते, जे अॅपचे एक प्रमुख फीचर्स आहे. खरं तर, बरेच लोक केवळ त्याच्या गोपनीयता वैशिष्ट्यांसाठी व्हॉट्सअॅप वापरतात. या एन्क्रिप्शनचा अर्थ असा आहे की फक्त पाठवणारा आणि प्राप्तकर्ताच संदेश वाचू शकतो. कंपनी देखील ते वाचू शकत नाही. हे फीचर्स डीफॉल्टनुसार चालू आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यात मेटाने खोटे दावे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात व्हॉट्सअॅप सर्व वापरकर्त्यांचे खाजगी संदेश संग्रहित करू शकते, विश्लेषण करू शकते आणि वाचू शकते असा आरोप आहे. त्यात व्हॉट्सअॅपने जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांची दिशाभूल केली आहे असाही आरोप आहे.
व्हिसलब्लोअरने त्यांना हे सत्य उघड करण्यास मदत केली. मेटाच्या प्रवक्त्याने हे आरोप बिनबुडाटे असल्याचे म्हटले आहे. कंपनी आरोप करणाऱ्या गटाविरुद्ध कारवाई करेल. ई-मेलद्वारे हे आरोप फेटाळले. त्यांनी सांगितले की व्हॉट्सअॅप संदेश एन्क्रिप्ट केलेले नसल्याचा कोणताही आरोप खोटा आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.


