Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

IND vs SL : शफाली वर्माची तुफान खेळी! टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवत जिंकला सामना

IND vs SL :  शफाली वर्माची तुफान खेळी! टीम इंडियाने श्रीलंकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवत जिंकला सामना

IND vs SL : सलामीवीर शफाली वर्मा हिने केलेल्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. अवघ्या 11.5 षटकांत श्रीलंकेचे आव्हान मोडीत काढत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवली आहे.

श्रीलंकेचा डाव १२८ धावांवर रोखला

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. क्रांती गौडने पहिल्याच षटकात सलामीवीर विश्मी गुणरत्नेला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार चामारी अटापट्टूने 31 धावांची खेळी करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्नेह राणाने तिला बाद करून श्रीलंकेला मोठा धक्का दिला. हर्षिता समरविक्रमा (33) आणि हसिनी परेरा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकात श्रीलंकेने ३ विकेट्स गमावल्या, ज्यामुळे त्यांना 20 षटकांत 9 बाद 128 धावांपर्यंतच मजल मारता आली.

शफाली वर्माची वादळी खेळी

दरम्यान, 129 धावांचे लक्ष्य गाठताना भारताची सुरुवात सावध झाली. स्मृती मंधना (14) स्वस्तात परतल्यानंतर शफाली वर्माने मैदानाचा ताबा घेतला. तिने श्रीलंकन गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. शफालीने अवघ्या 34 चेंडूत नाबाद 69 धावांची तडाखेबंद खेळी केली. यामध्ये तिने मैदानाच्या चहुबाजूंनी फटकेबाजी करत भारताचा विजय सुकर केला. जेमिमा रॉड्रिग्जने 26 धावांचे योगदान दिले, तर कर्णधार हरमनप्रीत कौर 10 धावा काढून बाद झाली. शफालीने विजयावर शिक्कामोर्तब होईपर्यंत आपली विकेट टिकवून ठेवली.

मालिकेत भारताचे वर्चस्व

भारतीय संघाने हे लक्ष्य केवळ 11.5 षटकांत पूर्ण केले, ज्यामुळे त्यांच्या धावगतीत (Run Rate) मोठी सुधारणा झाली आहे. मालिकेतील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार असून, तो जिंकल्यास भारतीय संघ मालिका आपल्या खिशात घालेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!